अकोले-मार्च अखेरीस अगस्ती सह. साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या पदरी निराशाच-संदीप भाऊसाहेब शेणकर.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या वर्षीची सभा खास गाजली कारण या वार्षिक सर्वसाधारण सभेचा केंद्रबिंदू केंद्र सरकार कडून आलेले 94 कोटी रुपयांचा निधी ठरला, या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाकडून अनेक आश्वासनांची उधाळपट्टी करण्यात आली कि, अनेक जणांनी अगस्ती कारखाना बंद पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले होते मात्र त्यांचे प्रयत्न उपयशी ठरले, व अगस्ती करखाण्याला 94 कोटींचा निधी आला, आता अगस्ती कारखाना कोणी थांबवू शकत नाही, संचालक मंडळाचा आत्मविश्वास पाहून सभासद शेतकरी देखील खूप उत्साहित झाले, मात्र गळीत हंगाम अखेरीस जाता पुढे पाठ तर मागे सपाट अशी स्थिती सुरु झाली आहे.
गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास चार महिने होत आले आहेत, मात्र आज पर्यंत अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून जानेवारी अखेर पर्यंतचे शेतकऱ्यांचे देणे देण्यात आलेले आहेत, वास्तविक पाहता अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे, तरी देखील अगस्ती साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या देणी देण्यात सातत्य आढळून येत नाही, त्याहीपुढे अगस्ती साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना 2500 प्रती मेट्रिक टन बाजारभाव देण्यात येत आहे, आज साखरेसह सर्व उप-पधार्थांची विक्री सुरु असताना देखील अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या देण्यांमध्ये नियमितता नाही तर गळीत हंगाम बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची देणी मिळणार कशी..? हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे, आणि दुसरा असा देखील प्रश्न या ठिकाणी आहे कि बाजूचे कारखाने 3000 रुपये प्रति मे. टन बाजारभावाने मस्टर टू मस्टर पेमेंट करत आहेत, आणि अगस्ती कारखान्याकडून 2500 रुपये प्रति मे. टन ने पेमेंट होत आहेत त्यात देखील भागातील उत्पादक शेतकऱ्यांचे 3 मास्टरचे जवळपास 33 कोटीचे पेमेंट बाकी आहेत, आणि त्यात 2500 रुपयांमध्ये भर घालणार कि नाही..? आणि घातली तर किती हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.तसेच कारखान्याच्या अनेक खात्यांमध्ये गैरव्यवहार दिसून येत आहेत, आज शेतकऱ्यांचा ऊस पेटवून नेला जात आहे व कारखाण्याच्या मटेरियल खरेदीत देखील गडबड आढळून येत आहे, या सर्व गोष्टींवर संचालक मंडळाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे,तर मग वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासणांचं काय असा जाहीर प्रश्न आज संदीप भाऊसाहेब शेनकर यांनी उपस्थित केला आहे.
Comments
Post a Comment