अकोले-वाद जागेचा लेकराच्या डोळ्यावर दगड तर आई जखमी

अकोले नगरपंचायत हद्दीतील धामणगाव रोड येथील दत्तनगर परिसरात राहत असलेल्या शिंदे कुटुंबीयांवर मोठा अन्याय होत असल्याची दिसत आहे. रामदास  शिंदे  यांच्या घरानजिक कुठलीही बांधकाम परवानगी न घेता अनाधिकृतपणे एका महिलेने बांधकाम सुरू केले आहे या बांधकामामुळे शिंदे यांच्या घराची भिंत अनेक ठिकाणी कोसळली असून भविष्यकाळात या घराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे यासंदर्भातील तक्रार शिंदे कुटुंबीयांनी अकोले नगरपंचायत तसेच सह आयुक्त अहिल्यानगर, त्याचबरोबर नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना करून देखील आज तागायत सदर महिलेचे  काम राजरोषपणे सुरू आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून सदर कुटुंब हे आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनाचे उंबरठे  झीजवत आहे . परंतु या निगरगठ्ठ प्रशासनाला अद्यापही जाग येताना दिसत नाही अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये असंख्य अनाधिकृत बांधकामे झाली आहे  आणि यावरच पडदा टाकण्यासाठी नगरपंचायत सदर बांधकामावर कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही.रामदास शिंदे यांची मुलगी निरुपमा प्रवीण देठे हिने आमचे घराचा पाईप का तोडता असे संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्या महिलेस विचारले असता तिने काही दिवसापूर्वी तिच्यावर दगडाने हल्ला केला विशेष बाब म्हणजे या महिलेने सात वर्षाच्या मुलाच्या डोळ्यावर देखील दगड फेकून मारला यामध्ये तो जबर जखमी झाला आहे या संदर्भातीत सदर महिलेसह इतर पाच जनांवर   अकोले पोलीस स्टेशन येथे दिनांक24/3/ 2025 रोजी गुन्हा दाखल झाला आहे भारतीय दंड संहिता कलम 118, 352, 351,324, 189, 191, 190 अदि. कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 यामध्ये रंजना गौतम जगधने, वर्षा आकाश काशीकेदार, आकाश नारायण काशीकेदार, संदेश नारायण काशीकेदार, भरत कर्णिक, स्वप्निल कर्णिक, अशा एकूण सहा जणांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहेया प्रकरणात एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न शिंदे कुटुंबीय करत आहेत तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हास न्याय द्यावा  असे आवाहन शिंदे कुटुंबांनी केले आहे.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस अकोले.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..