अकोले-स्थानिकांचा वाळुला विरोध,लाभार्थी आत्मदहनाचा इशारा देण्याच्या तयारीत,घरकुल लाभार्थी वाळु पासून वंचितच

अकोले तालुक्यातील कळस गावातील शासकीय वाळु डेपोतुन घरकुलांसाठी पाच ब्रास वाळु दिली जात असुन ढोकरी गावातील लाभार्थ्यी यांनी तलाठी व तहसीलदार कार्यालयाला सबंधित गोष्टी शासकीय पूर्तता केल्यानंतर कळस गावातील वाळु डेपो तुन वाळु वाटप करण्यात येत आहे माञ स्थानिक,शासन व वाहततुकदार यांच्या वादात माञ लाभार्थी वंचित राहत असल्याचे नाराजी ढोकरी गावातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे कारण स्थानिक ढोकरी व शेजारील गावातील इतर ग्रामस्थांनी वाळु वाहतुकीसाठी एका वाळु व्यवसायिकाचे वाहने भाड्यापोटी सांगितले आहे.ही वाहने शासकीय नियमाच्या प्रमाणे जि.पि.एस.प्रणालीव्दारे नियमाच्या आधिन राहून काम करत असल्याच सुञांकडुन कळत आहे.तसेच जेसीबी ला कॅमेरा सिस्टीम असल्याने कुठल्याही प्रकारचे अनधिकृत काम केले नसल्याच वाळु वाहतूक करणा-या व्यवसायिकाने कळवले आहे माञ स्थानिक ठिकाणची वाळु ही बाहेर गावी जात असल्याने व स्थानिक काही मंडळींनी विरोध केला आहे यामुळे महसुलमंञी व शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली गेल्याच दिसत आहे.आज रोजी घरकुल बांधकाम करणा-या लाभार्थ्याला पाच ब्रास वाळु देण्याचे धोरण सरकार कडून घेण्यात आले कारण सामान्य व्यक्तीच्या घरकुलासाठी तोकड्या निधीमुळे घरकुलाचे काम हे पूर्ण होत नसल्याच समोर आल होत.म्हणून या घरकुलाच्या कामासाठी महसुलमंञ्याकडुन पाच ब्रास वाळु देण्याची घोषणा देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाळूच्या डेपो हे खुले करण्यात होते.या मध्ये ज्यांना कोणी लाभार्थ्यी यांना वाळूची आवश्यकता असेल अश्या लाभार्थ्या यांना तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो त्यानंतर उपल्बधता लक्षात घेऊन स्थानिक,तलाठी व मंडलाधिकारी यांच्या मार्फत वाळूचे वाहन परमिट देत वाळु उपल्बध करुन दिली जाते यासाठी वाहनाशिवाय जि.पि.एस यंञणा असणे बंधनकारक असते माञ आता गावोगावी उपल्बध होणा-या वाळु साठे असणारे गावातील स्थानिक लोक विरोध करताना दिसत आहेत.संपादक-भाऊसाहेब साळवे,सह संपादक-किशोर मोहिते न्यूज सह्याद्री एक्सप्रेस अकोले

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..