अकोले-निंब्रळ गावात पिसाळलेल्या कुञ्याचा अनेक ग्रामस्थ व दुभत्या गायींना चावा
अकोले तालुक्यातील निंब्रळ गावात पिसाळलेल्या कुञ्याने हौदोस घातला असुन अनेक ग्रामस्थ व मुले यांना चावा घेतल्यामुळे निंब्रळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते.काल दिवसभरामध्ये अश्या अनेक घटना घडल्यामुळे शालेय मुलांना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.गावातील काही सतर्क युवकांनी या संदर्भात गावातील ग्रामस्थांना व्हाटस अप, फोन व्दारे फोन करुन कळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.माञ गावातीत काही दुध देणा-या जनावरांना ही पिसाळलेले कुञे चावल्याने अनेक शेतकर्यांचे मोठे नुसकान झाले आहे गावातील युवकांनी आवाहन केले होते.आपल्या गावामध्ये कुत्रा पिसळलला आहे तरी आपआपल्याला कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवावे, ज्यांचे मूल शाळेत आहे त्यांना शाळा सुटल्यावर. की घरी घेऊन जावे.तसेच आपआपल्याला कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवावे, ज्यांचे मूल शाळेत आहे त्यांना शाळा सुटल्यावर घरी घेऊन जावे ही नम्र विनंती.माञ या बाबत ग्रामस्थांनी आरोग्य विभागाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.आरोग्य विभागाने सदर गोष्ट लक्षात घेऊन काळजी सदर पिसाळलेल्या जुन्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असुन ज्यांना कोणाला हा पिसाळलेला कुञा चावला आहे त्यांच्यावर गावातच उपचार करावे अशी मागणी आता अंबिका माता मिञ मंडळ व ग्रामस्थांनी केली आहे,न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी किशोर मोहिते अकोले.
Comments
Post a Comment