सत्ताधारी भाजप मध्ये अंतर्गत विसंवाद व विरोधी नगरसेवकांनी मांडली विसंवादाचे लक्तरे अकोलेच्या वेशीवर

अकोले नगरपंचायत मध्ये सध्या भाजप हा सत्ताधारी पक्ष असुन माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाने नगरपंचायतच्या सतरा पैकी बारा जागा जिंकल्या,शिवसेना दोन,राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक म्हणजे अर्थात ग्रामपंचायत नंतर अस्तित्वात आलेली नगरपंचायत ही माजी आमदार वैभवराव पिचड यांच्याकडे एकहाती राहिली अस म्हणायला हरकत नाही माञ सातत्याने येथे कुरघोडीच्या राजकारणामुळे कामे कमी आणि वाद,सत्ताधारी असणा-या नगरसेवकांच्या विसंवादामुळे ही नगरपंचायत कायम चर्चेचा विषय ठरली आहे.कधी नगराध्याक्ष असलेल्या व्यक्तीवर अविश्वास तर कधी जातीय राजकारणाचा शिरकाव झाल्याने इथला नगराध्यक्ष हा कधी पदावरून खेचला जाईल याचा नेमच राहिलेला नाही एकी कडे कुरघोडीच्या राजकारणाचा फटका माञ अकोलेतील विकास कामांना बसला.सत्तेत बसलेल्या व विरोधात बसलेल्या या "तु,तु-मैं,मै"फायदा माञ ठेकेदार मंडळींनी जोरात उचलेला सध्या दिसून येत आहे.आज झालेल्या नगरपंचायतच्या बैठक संपल्यानंतर नगरपंचायतचे सत्ताधारी नगरसेवक हे पाय-यांवर येत आपल्या प्रभागात मोजकेच कामे झालेली सांगत होते काल झालेल्या नगरपंचायतच्या मासिक मिटिंग मध्ये असताना काल सर्व विषय हे नामंजूर करण्यात आले आहेत यामुळे काल हा नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात आबेबेल नसल्याच दिसुन आल आहे.तर काही ठिकाणी ठेकेदार यांच्या सह नगरपंचायतच्या नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे कोणाचे ही ऎकत नसून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर जी कामे पूर्ण झालेली नाही,त्यांना ही बिले असा करण्यात आली तर काही कामांना विलंब झाल्याने वारंवार मुदत वाढ देऊन ही ठेकेदार ऎकायला तयार नाही मग ठेकेदार जर आमचे एकत्र नसतील,नगराध्यक्ष मनमानी करत असतील तर आम्ही राजिनामा देण्याच्या मनस्थितीत आलो असल्याच नगरसेवक यांनी म्हटल आहे.माञ हे बोलताना सत्ताधारी नगरसेवकांनी सावध भुमिका घेत आम्ही नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात आमचे बंड असुन पक्षाच्या विरोधी नाही यामुळे पक्ष बदल हा नाही हे सांगायला विसरले नाहीत.भाजपाच्या ताब्यात सत्ता असल्याने माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नगरपंचायतच्या कारभारात सुक्ष्म लक्ष घालण्याची गरज होती लक्ष न दिल्याने आज पर्यंत त्यांच्या तीन नगराध्यक्ष यांना अर्धवट कारभार सोडून पायउतार व्हावे लागले आहे.लोकांनी टाकलेल्या मतांचा एक प्रकारे हा अनादरच म्हणता येईल.ठेकेदार नगसेवकांचे एकत्र नाही मग त्यांच्यावर कारवाई का नाही असे अनेक प्रश्न हे अनुउत्तरीत राहत आहे.अलीकडच्या जनतेला नगरपंचायत आल्यानंतर काहीच फायदा झाला नाही अस म्हटल तरी वावगे ठरणार नाही कारण अकोले शहरात सष्टपणे दिसतील अशी कुठेच कामे दिसत नाहीत फक्त किरकोळ कामे,निधी,वाद,विसंवाद भ्रष्टाचार यानेच नगरपंचायत जास्त चर्चेत आली आहे.यामुळे नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत परवडली अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.येणा-या निवडणुकीत शिंदे गट,अजित पवार,शरद पवार,भाजपा, दोन शिवसेना अशी लढत पुढे पहायला मिळेल त्यासाठी आप,आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी प्रत्येकजण आता पुढे येणार आहे.ऎकमेंकांवर आरोप प्रत्यारोप होणार आहे.यामुळे अजून ही माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जर बारकाईने लक्ष घातले तर अजून ही काही गोष्टी या व्यवस्थित होऊ शकतात माञ नगरपंचायत ही ठेकेदारां बरोबरच ठराविक नगरसेवकांच्या पोट भरण्याचे साधन झाले की काय?मतदार जनतेला न्याय देण्यापेक्षा स्वत:लाच न्याय देण्याच्या भूमिकेत आल्याच दिसुन येत आहे त्यातच निधीची कमतरता आणि चोरून कामांमध्ये केलेली भागीदारी यामुळे नगरपंचायत कामे कमी आणि जिरवाजिरवीच जास्त अशी त-हा आता दिसत आहे.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोले पंचायत समिती मध्ये आढावा घेताना आजी,माजी नगरसेवकांना जाब विचारला होता अकोले हे माझे जन्मगाव आहे मला भरपुर निधी देण्याची इच्छा असताना मला कामांचे प्रस्ताव का दिले जात नाही यामुळे नगरपंचायत ही निधी मागण्यात,प्रस्ताव देण्यात ही जाणिवपुर्णक टाळाटाळ करते की काय असा प्रश्न ही या निमित्ताने पुढे आला आहे .न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते.अकोले

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..