अकोले-शरद पवार गटाच्या जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या मुलाखतीत ही वशिलेबाजी !!!!
अकोले तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखती पार पडल्या या मुलाखती घेण्यासाठी जिल्हा अध्यक्ष संदिप वर्पे,अमित भांगरे, तालुका अध्यक्ष सुरेश गडाख,सुरेश खांडगे आदि नेते या मुलाखती घेण्यासाठी आज अकोले विश्रामगृहावर उपस्थित होते.जिल्हा परीषद व पंचायत समिती साठी अनेक नवखे कार्यकर्ते आज निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असल्याच दिसुन आले आहे माञ आगामी येणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीची बैठक व मुलाखती दरम्यान अमित भांगरे हे उपस्थित राहिल्याने अनेकांनी खाजगीत आश्चर्य व्यक्त केले आहे.कारण त्यांच्या कुटुंबात एकाच घरातील राजकीय विभागणी लक्षात घेऊन त्यांनी या प्रक्रियेपासुन लांब राहण्याची गरज दिसुन येत होती माञ आपण जिल्हा युवकचे पदाधिकारी असल्याने आपण उपस्थित राहिल्याचा आविर्भाव दिसून आला.निवडणुक प्रक्रियेत उमेदवारी वाटपात अमित भांगरे यांचा हस्तक्षेप जर येत्या काळात राहिला तर अनेक भावी उमेदवारांचे मनोबल हे खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही यामुळे महायुतीत एकतर्फी झेंडा हा जिल्हा परीषद पंचायत समितीत झळकणार आहे.माञ पक्षाच्या अनेक कार्यकर्ते यांच्या मध्ये संभ्रमावस्था असुन ज्यांना भावी आमदार व नेतृत्व स्वीकारावे तो नेता शरद पवार गटातुन बाहेर पडत असल्याने आता कार्यकर्ते हे शरद पवार गटात अस्वस्थ असल्याच दिसुन येत आहे तर काल पञकार परिषदेत दरम्यान जिल्हा अध्यक्ष संदिप वर्पे यांनी पञकार बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना प्रत्येक गोष्टीवर पांघरुन घालण्याचा प्रयन्न करत आपला पक्ष हा ताकदीने जिल्हा परीषद,पंचायत समितीच्या निवडणुका लढणार असल्याच म्हटल आहे.माञ अमित भांगरे यांना पञकार बांधवांच्या प्रश्नांना समाधान कारक उत्तर देता आहे नाही महाविकास आघाडी ताकदीवर उमेदवार देणार अशी वल्गना त्यांनी केली माञ खरच शरद पवार गटात आता ताकदीवर उमेदवार दिले जाणार का?की फक्त निवडणुका या वगनाट्य ठरणार असा सवाल आता अकोलेत चर्चेत आहेत.कार्यकर्ते यांचा फक्त राजकीय शटलमेंट मध्ये बळी दिला जाणार यामुळे अनेकांनी शरद पवार गटातुन उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातच मुलाखती साठी मोजकेच कार्यकर्ते हे आल्याने येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटात चालु असलेल्या गोंधळाचा परीनाम हा सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटावर होणार असल्याच दिसुन येत आहे.या बाबतीत काँग्रेस व शिवसेना पक्ष पदाधिकारी हे काय निर्णय घेणार की शरद पवार गट वगळुन वेगळी काँग्रेस व शिवसेनेची युती करणार की अकोले तालुक्यात वेगळी आघाडी होणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.कारण शरद पवार गटात चालु असलेल्या गोष्टींचा परीनाम हा थेट सहयोगी पक्षांना भोगावा लागणार आहे.अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असुन पाच ही गटात त्यांचे जिल्हा परीषद उमेदवार बॅनरबाजी करताना दिसुन येत आहे.जनतेत जाऊन मतदारांच्या गाठभेटीं उमेदवारांकडुन सुरु आहेत माञ शरद पवार गटात आताशी मुलाखतींचा सिलसिला सुरु झाला आहे यामुळे वरातीचे मागून घोडे अशीच त-हा सध्या शरद पवार गटात दिसुन येत आहे कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणुन ओळखला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अलीकडच्या काळात पीछेहाट झाल्यावर चिञ दिसुन येत आहे.काल शरद पवार गटाच्या मुलाखती दरम्यान वशिलेबाजीचा फंडाची दिसुन आल्याने सामान्य कार्यकर्ते यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली आहे.खेडेगावातुन अनेक भागातील कार्यकर्ते हे मुलाखतीला हजर होते माञ मुलाखती मध्ये पहिलाच नंबर हा विकास कचरु शेटे यांचा घेण्यात आला कारण देण्यात आले की त्यांना महत्वाचे काम आहे माञ यामुळे शरद पवार गटातील बाहेर बसलेल्या कार्यकर्ते यांनी पक्षात आता सामान्य कार्यकर्ते यांना किंमत नसल्याची चर्चा सुरु होती.मुलाखती दरम्यान अपवाद वगळता कोणताही व्यक्तीगत राजकीय छाप नसणारे लोक काल मुलाखतीसांठी दिसुन आले नाहीत यामुळे महायुतीसाठी निवडणुक सोपी होणार असल्याचा कयास अनेकांनी बांधला आहे.त्यातच विकास शेटे यांचे कुटुंब हे कट्टर अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांचे समर्थक म्हणुन ओळखले जातात माञ काल त्यांनी मुलाखती साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात मुलाखतीसाठी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरवेळी राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलणारे नेते, राजकीय प्रास्थापित लोक यामुळे अकोले तालुक्यात कार्यकर्ते हे वैतागले नाइलाजास्तव दगडापेक्षा विट मऊ म्हणत महायुतीकडे जाताना दिसत आहेत.
क्रमशः -भाग २

Comments
Post a Comment