सौ.गिरिजा पिचड,म्हाञे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...
महाराष्ट्रातील राजकीय मातब्बर घराणे समजले जाणारे स्वर्गीय आदिवासी विकास मंञी मधुकरराव पिचड यांची नात व माजी आमदार वैभवराव पिचड यांची पुतणी सौ. गिरीजा पिचड म्हात्रे ह्यानी आज काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पिचड घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाल्याच आता समोर येत आहे.काही दिवसांपूर्वी गिरिजा म्हाञे यांनी या संदर्भात माजी महसुल मंञी,काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. आज काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेल्या टिळक भवन येथे त्यांनी अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गिरीजा पिचड-म्हाञे ह्याचा सत्कार करून काँग्रेस परिवारात मनःपूर्वक स्वागत केले.गिरीजा पिचड यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची मोठी कारकीर्द ही काँग्रेस पक्षात गेली होती माञ १९९९साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनेवेळी स्व.आदिवासी विकास मंञी पिचड यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता आता पुन्हा १९९९नंतर २०२५पिचड घराण्यातील राजकारण करु इच्छणारी त्यांची नात गिरीजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.हा प्रवेश येणाऱ्या आगामी जि.प.व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर झाल्यावर बोलला जात आहे माञ गिरिजा पिचड-म्हाञे कोणत्या ठिकाणी उमेदवारी करणार याची सष्टता होऊ शकली नाही माञ काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनिताताई भांगरे यांचा प्रवेश भाजपात घडवुन आणला होता आज माञ त्यांच्याच पुतणी गिरिजा हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे.न्युज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले.


Comments
Post a Comment