अकोले-अकोले शहर व परीसरासाठी धक्कादायक बातमी...अपघातात चौघेजण मयत
अकोले अकोले शहरासाठी धक्कादायक बातमी समोर येत असुन अकोले शहरात राहणारे विसाळ व धारणकर परीवारातील व्यक्तींचा पुण्याकडुन घरी येत असताना एम.एच.१७.ए.जे २६९६ या चारचाकी छोट्या गाडीवर मालवाहु ट्रक कोसळल्याने डोळासणे व चंदनापुरी या शिवारातील रस्त्यावर अपघात झाला असुन या अपघातातील वाहनात लहान मुले, महिला यांचा सहभाग आहे या घटनेमुळे अकोले शहर हे पूर्णतः:दुखात बुडाले असुन अनेक मिञ परिवार यांनी संगमनेर येथे धाव घेतली असुन काही व्यक्ती या गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर मेडीकव्हर हाॅस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.गाडी मध्ये एकुण पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.तर त्यापैकी चार जण महत्त्व आहेत अकोले शहरात आपल्या व्यवसायामुळे प्रख्यात असलेले विसाळ कुटुंब असुन काही कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते पुणे येथे गेले होते परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला आहे.गाडी ही पूर्णतःमालवाहु ट्रक खाली चेपली गेली होती.अकोले शहरात अचानक आलेल्या या बातमीमुळे अकोले शहर व मिञ परीवारावर शोककळा पसरली आहे.मयत व्यक्ती मध्ये एकुण चार असलेल समजत आहे.त्यामध्ये सुनील धारणकर ,त्यांची पत्नी,नात (वय...