अकोले तालुक्याचे विभाजन करून राजुर तालुक्याची निर्मिती करा-आदिवासी समाज संघटना
अकोले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा आहे अदिवासी भागातील खेडया पाड्यातील अपुरी दळणवळण व्यवस्था अपुरी असल्याने अदिवासीबांधवांना जाणे येणे गैर सोयीचे होते पूर्ण दिवस जातो कुठे तरी मुक्कामी बस स्थानक व इतर ठिकाणी थांबावे लागते यामुळे वेळेत काम होत नाही वेळ वाया जातो या करता अकोले तालुक्याचे विभाजन करून हिवाळी अधिवेशन मध्ये हा विषय घेऊन राजुर तालुक्याची निर्मिती करावी ही जुन्या मागणी ची दखल घेऊन नवीन राजुर तालुक्याला मंजुरी दयावी अदिवासी भागातील राजुर ही मध्यवर्ती बाजार पेठ आहे, या ठिकाणी अदिवासी प्रकल्प कार्यालय. शैक्षणिक सुविधा. न्यायालय. आरोग्य सुविधा. प्रशासकीय सुविधा उपलब्ध आहेत. खर्या अर्थाने राजुर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाज सेवक अनंत महादु घाणे.. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे. बाजीराव सगभोर. अदिवासी ऊन ती अध्यक्ष भरत घाणे. सुरेश गभाले. दत्ता ढगे. नरहरी इदे. भिमा अवसरकर. दौलत देशमुख. पाडूरग पदमेरे. अशोक भोजणे. सुनील मधे. दिनकर कडाळी. गोपाळा कडाळी. हनुमंत बुळे, तुकाराम सारूक्ते. आदि उपस्थित समाज बांधवांनी अकोले तालुक्याचे विभाजन होऊन राजुर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी सर्व आदिवासी संघटना चे वतीने मागणी केली. राजुर तालुक्याची निर्मिती झाल्यास आदिवासी समाज बांधवाचा विकास होऊन शासकीय, योजना राबविण्यात प्रशासकीय सोईचे होईल. शासनाने दखल घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी आता नव्यानेच होत आहे यामुळे अकोले तालुका अन राजूर तालुका होणे शक्य आहे का याकडे विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत.
Comments
Post a Comment