अकोले भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रति लोकभावना - माजी आमदार वैभवराव पिचड
अकोले प्रतिनिधी -मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्तेकडे कूच केल्याने अकोले भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपच्या येथील कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले. कार्यलयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली होती. निकाल येत होते तसतसे कार्यकर्ते ‘भाजप झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’ हर हर मोदी, घर घर मोदी च्या घोषणा देत होते.
तीन राज्यातील हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामाची पावती असून यातून जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावर असलेला विश्वास आहे,अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत अभाळे, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे,भाजप तालुका सरचिटणीस राहुल देशमुख,मच्छिन्द्र मंडलिक, सचिन जोशी,महिला अध्यक्षा सोनाली नाईकवाडी,नगराध्यक्ष aबाळासाहेब वडजे,जिल्हा उपाध्यक्ष सोमदास पवार,धनंजय संत,महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे,अशोक आवारी, कैलास तळेकर,सखाहारी पांडे, मच्छिन्द्र चौधरी, शुभम खर्डे यांनी एकमेकांना पेढे भरवले.
--------------
Comments
Post a Comment