Posts

Showing posts from August, 2024

अकोले-येत्या ३०तारखेला ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांचा अहिल्यानगर जिल्हा परिषदे समोर येथे काम बंद व धरणे आंदोलन

Image
अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना NGP 4511 च्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध हक्कांच्या मागण्यांबाबत शुक्रवार दिनांक 30/8/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या काम बंद तथा धरणे आंदोलनाबाबत आज अकोले तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुका कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती... त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.. खूप काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना अद्यापही वेळेत थकीत तसेच चालू किमान वेतन, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी दिला जात नाही..,सेवा पुस्तिका अद्यावत  नाही ,अपघात विमा उतरवला जात नाही , ड्रेस कोड तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षा साहित्य दिले जात नाही, जबाबदारी नसताना विवीध प्रकारच्या कामांचा बोजा लादला जातो.अशाप्रकारे ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची हेळसांड केली जाते. याबाबत आवाज उठवण्यासाठी मोर्चे आंदोलने करावी लागतात फार मोठा दुर्दैव म्हणावं लागेल.ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा पाया समजल...

टाकळी-शिवाजी तिकांडे सर व परिवाराकडून टाकळी शाळेस ब्ल्यूटुथ ट्राॅली स्पिकर संच भेट

Image
*अकोले - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांतर्गत ७८ व्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने टाकळी गावचे भूमिपुत्र व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. शिवाजी तिकांडे सर व परिवाराकडून अकोले तालुक्याच्या देवठाण बीटातील जिल्हा परिषद टाकळी शाळेस ८००० रुपये किंमतीचा एक ब्ल्यूटुथ ट्राॅली स्पिकर संच भेट देण्यात आला.‌ याप्रसंगी शाळा व गावाकडून श्री. शिवाजी तिकांडे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी स्वतंत्रता दिनाचे ध्वजारोहण व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब फोडसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी गावचे माजी सरपंच श्री. रामहरी तिकांडे हे होते. यावेळी टाकळी गावातील ज्ञानेश्वर तिकांडे, अतुल तिकांडे, सौरभ मोरे, कल्पेश थोरात, ज्ञानेश्वरी दातखिळे, साक्षी फोडसे, दुर्गा बर्डे या विविध स्पर्धा परीक्षेत यशवंत आजी माजी विद्यार्थ्यांचा संयोजन समितीकडून सत्कार करण्यात आला. या समारंभात टाकळी शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची...

समशेरपुर-ग्रामपंचायत कडुन जिल्हा परिषद शाळांना सहा इंटेरीक्टीव बोर्ड भेट

Image
समशेरपुर-पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून समशेरपुर ग्रामपंचायतीकडून समशेपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद शाळांना सात इंटरेक्टीव्ह(75") बोर्डाचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समशेरपुर चे सरपंच कॉ. एकनाथ मेंगाळ, अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. समशेरपुर केंद्र शाळेत आयोजित  केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी  माजी सरपंच दत्तु माळी , विष्णु उगले, शंकर चोखंडे, जनाबाई साळवे, रामदास पठारे, मधु सूर्यवंशी, योगेश भरीतकर , अमोल दराडे, ग्रामविकास अधिकारी घिगे, रवींद्र जोरवर, वसिम शेख,शंकर बेणके मुख्याध्यापक दुर्गुडे, ज्येष्ठ शिक्षक पोपट ढोन्नर,शालेय समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम आदी उपस्थित होते. सध्या जगामध्ये डिजिटल युगाचा जमाना आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  डिजिटल जगाची ओळख व्हावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत य...

पक्षाचे तिकीट मिळो न मिळो भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी-कार्यकर्ते यांची मागणी

Image
अकोले,ता.१०: पक्षाचे तिकीट मिळो न मिळो भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थकांनी धरल्याने अकोलेतील 'महायुती'तील विसंवादाचे तडे रूंदावणार असल्याचे संकेत अकोले महायुतीत पहायला मिळाले आहेत. दरम्यान, वैभव पिचड यांनी महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांवर टीकेचा भडिमार केल्याने मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता अधिक बळकट झाली.विविध क्षेत्रातील मान्यवर, समर्थक कार्यकर्ते, नागरिक यांचा देवठाण,कोतुळ येथे संवाद मेळावा पार पडला आहे.अध्यक्षस्थानी व्यापारी रामनिवास राठी होते. माजी आमदार वैभव पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती.अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत.आता आम्हाला आमची चूक सुधारायची असून आम्ही तुम्हाला आमदार करणारचं, त्यादृष्टीने तुम्हाला तिकीट मिळो अगर ना मिळो तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवावीच लागेल असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला.यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी विद्यमान आमदारांवर सडकून टीका केली. आमदारकीआधी विद्यमान आमदार भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. नंतर ज्येष्ठ...

अकोले-भंडारादरा धरणग्रस्त शेतकऱ्यांना पिण्याच्या पण्यासहित शेतीसाठी मोफत पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार- मारुती मेंगाळ

Image
अकोले - उत्तर नगर जिल्ह्याची जीवन दायनी असलेल्या भांडारदरा धरण पूर्ण  क्षमतेने भरले आहे. या धरणाचे आज मा.उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले . भंडारदरा धरणाच्या एकूण पाणी साठ्या पैकी धरणाच्या मागील भाग ( बॅक वॉटर) करिता एकूण क्षेत्रासाठी 6. टक्के पाणी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेती साठी शेतकऱ्यांना उचलण्यासाठी राखीव  साठा उपलब्ध आहे मात्र या पाणी साठ्याचा पाहिजे तितका फायदा धरणाच्या मागील भागातील म्हणजे धरणग्रस्त शेतकऱ्यांना आज वर झालेला नाही.या शेतकऱ्यांना आदिवासी उपयोजनेचा पैसा खर्च करून धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मोफत पाणी उपलब्ध करून देता येईल त्या साठी विधान सभा निवडणुकीनंतर मी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी देविदास खडके, लक्ष्मण  उघडे, सखाराम गांगड, प्रकाश उघडे, चंदर गांगड, बुवांजी गांगड,पोपट मेंगाळ, आनंद गिऱ्हे, मावांजी अगिवले, अजय भांगरे,राजू उघडे, शांताराम उघडे,उपस्थित होते. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज मारुती मेंगाळ यांनी या धरणाचे जल पूजन केले.ते या प्रसंगी बोलत होते. भंडारदरा ...