अकोले-येत्या ३०तारखेला ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांचा अहिल्यानगर जिल्हा परिषदे समोर येथे काम बंद व धरणे आंदोलन
अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना NGP 4511 च्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध हक्कांच्या मागण्यांबाबत शुक्रवार दिनांक 30/8/2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या काम बंद तथा धरणे आंदोलनाबाबत आज अकोले तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुका कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती... त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.. खूप काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना अद्यापही वेळेत थकीत तसेच चालू किमान वेतन, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी दिला जात नाही..,सेवा पुस्तिका अद्यावत नाही ,अपघात विमा उतरवला जात नाही , ड्रेस कोड तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षा साहित्य दिले जात नाही, जबाबदारी नसताना विवीध प्रकारच्या कामांचा बोजा लादला जातो.अशाप्रकारे ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची हेळसांड केली जाते. याबाबत आवाज उठवण्यासाठी मोर्चे आंदोलने करावी लागतात फार मोठा दुर्दैव म्हणावं लागेल.ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा पाया समजला जातो.शासनाच्या विविध प्रकारच्या योजना गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कर्मचारी करतात... तरीही कर्मचारी बांधवांकडे लक्ष दिले जात नाही.या सर्व हक्काच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी काम बंद व धरणे आंदोलनाला सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपरावजी डिके, जिल्हा सचिव श्री आत्माराम घुणे, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका सचिव श्री संतोष नाईकवाडी, कार्याध्यक्ष श्री मनेश वैराळ, जिल्हा संघटक श्री रामदास ससाने, तालुका अध्यक्ष श्री संदीप घोडके व इतर पदाधिकारी संजय सोनवणे, संदीप वाकचौरे, नवनाथ शेटे, शिवाजी आवारी, बाळचंद जोंधळे, नितीन बोऱ्हाडे, तुकाराम कडाळी, पांडुरंग चासकर,हेमंत हंगेकर,गोरक्षनाथ भांगरे, योगेश देशमुख, केरू पवार,प्रकाश जाधव, दत्तात्रेय फापाळे बाळू उगले, भागा पथवे, त्र्यंबक मडके,सुभाष शिंगवान यांच्याकडून करण्यात आलेले आहे.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस किशोर मोहिते*
Comments
Post a Comment