Posts

Showing posts from July, 2025

अकोले-अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब...स्वरा काळु तपासे हिची सातारा सैनिकी स्कूल साठी निवड

Image
        अकोले- संरक्षण मंत्रालय संचलित सातारा सैनिकी स्कूल येथे स्वराची इयत्ता सहावी साठी निवड. संरक्षण मंत्रालय  भारत सरकार यांचे देशभरामध्ये फक्त 33 सैनिकी स्कूल आहेत.या विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थी परीक्षा देतात.  स्वराने  या प्रवेश परीक्षेमध्ये 300 पैकी 279गुण मिळवून राज्यांत मुलींमधून (एस.सी.प्रवर्गातून) पहिला येण्याचा मान मिळवला.  सातारा सिव्हिल येथे दोन दिवसाचे मेडिकल पूर्ण केल्यानंतर तिची निवड निश्चित झाली.स्वरांनी इयत्ता चौथीत असतानाच पहिल्या प्रयत्नात सैनिक स्कुल चंद्रपूर येथे प्रवेश मिळवला होता. चालू वर्षी ती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नवोदय  विद्यालय  टाकळी ढोकेश्वर  अहिल्यानगर येथे ही निवड झाली होती.स्वरा जि. प प्रा. शाळा धामणगाव आवारी ची विद्यार्थीनीं असून तिच्या यशा मध्ये वर्ग शिक्षक श्री विक्रम गायकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच आय कॅन इन्स्टिट्यूट पंढरपूरचे संचालक विवेकानंद भोसले सर व आय कॅन इन्स्टिट्यूट चे ...

अकोले-अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब..कुमारी.स्वरा काळु तपासे हिची सातारा सैनिकी स्कूल साठी निवड

Image
अकोले-सरंक्षण मंत्रालय संचलित सातारा सैनिकी स्कूल येथे स्वराची इयत्ता सहावी साठी निवड. संरक्षण मंत्रालय  भारत सरकार यांचे देशभरामध्ये फक्त 33 सैनिकी स्कूल आहेत.या विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थी परीक्षा देतात.  स्वराने  या प्रवेश परीक्षेमध्ये 300 पैकी 279गुण मिळवून राज्यांत मुलींमधून (एस.सी.प्रवर्गातून) पहिला येण्याचा मान मिळवला.  सातारा सिव्हिल येथे दोन दिवसाचे मेडिकल पूर्ण केल्यानंतर तिची निवड निश्चित झाली.स्वरांनी इयत्ता चौथीत असतानाच पहिल्या प्रयत्नात सैनिक स्कुल चंद्रपूर येथे प्रवेश मिळवला होता. चालू वर्षी ती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नवोदय  विद्यालय  टाकळी ढोकेश्वर  अहिल्यानगर येथे ही निवड झाली होती.स्वरा जि. प प्रा. शाळा धामणगाव आवारी ची विद्यार्थीनीं असून तिच्या यशा मध्ये वर्ग शिक्षक श्री विक्रम गायकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच आय कॅन इन्स्टिट्यूट पंढरपूरचे संचालक विवेकानंद भोसले सर व आय कॅन इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री नवनाथ देशमुख सर...

सत्ताधारी भाजप मध्ये अंतर्गत विसंवाद व विरोधी नगरसेवकांनी मांडली विसंवादाचे लक्तरे अकोलेच्या वेशीवर

Image
अकोले नगरपंचायत मध्ये सध्या भाजप हा सत्ताधारी पक्ष असुन माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाने नगरपंचायतच्या सतरा पैकी बारा जागा जिंकल्या,शिवसेना दोन,राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक म्हणजे अर्थात ग्रामपंचायत नंतर अस्तित्वात आलेली नगरपंचायत ही माजी आमदार वैभवराव पिचड यांच्याकडे एकहाती राहिली अस म्हणायला हरकत नाही माञ सातत्याने येथे कुरघोडीच्या राजकारणामुळे कामे कमी आणि वाद,सत्ताधारी असणा-या नगरसेवकांच्या विसंवादामुळे ही नगरपंचायत कायम चर्चेचा विषय ठरली आहे.कधी नगराध्याक्ष असलेल्या व्यक्तीवर अविश्वास तर कधी जातीय राजकारणाचा शिरकाव झाल्याने इथला नगराध्यक्ष हा कधी पदावरून खेचला जाईल याचा नेमच राहिलेला नाही एकी कडे कुरघोडीच्या राजकारणाचा फटका माञ अकोलेतील विकास कामांना बसला. सत्तेत बसलेल्या व विरोधात बसलेल्या या "तु,तु-मैं,मै"फायदा माञ ठेकेदार मंडळींनी जोरात उचलेला सध्या दिसून येत आहे.आज झालेल्या नगरपंचायतच्या बैठक संपल्यानंतर नगरपंचायतचे सत्ताधारी नगरसेवक हे पाय-यांवर येत आपल्या प्रभागात मोजकेच कामे झालेली सांगत होते काल झालेल्या नगरपंचायतच्या...

अकोले-निंब्रळ गावात पिसाळलेल्या कुञ्याचा अनेक ग्रामस्थ व दुभत्या गायींना चावा

Image
अकोले तालुक्यातील निंब्रळ गावात पिसाळलेल्या कुञ्याने हौदोस घातला असुन अनेक ग्रामस्थ व मुले यांना चावा घेतल्यामुळे निंब्रळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते.काल दिवसभरामध्ये अश्या अनेक घटना घडल्यामुळे शालेय मुलांना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.गावातील काही सतर्क युवकांनी या संदर्भात गावातील ग्रामस्थांना व्हाटस अप, फोन व्दारे फोन करुन कळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.माञ गावातीत काही दुध देणा-या जनावरांना ही पिसाळलेले कुञे चावल्याने अनेक शेतकर्यांचे मोठे नुसकान झाले आहे गावातील युवकांनी आवाहन केले होते.आपल्या गावामध्ये कुत्रा पिसळलला आहे तरी आपआपल्याला कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवावे, ज्यांचे मूल शाळेत आहे त्यांना शाळा सुटल्यावर. की घरी घेऊन जावे.तसेच  आपआपल्याला कुटुंबातील सदस्यांवर लक्ष ठेवावे, ज्यांचे मूल शाळेत आहे त्यांना शाळा सुटल्यावर घरी घेऊन जावे ही नम्र विनंती.माञ या बाबत ग्रामस्थांनी आरोग्य विभागाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.आरोग्य विभागाने सदर गोष्ट लक्षात घेऊन काळजी सदर पिसाळलेल्या जुन्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असुन ज्यांना कोण...

अकोले तालुक्यात जलजीवन योजनाचे कामं रखडले,खासदार भाऊसाहेब वाकचौरे अधिकाऱ्यांवर भडकले

Image
अकोले : प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जलजीवन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन ठेकेदार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अकोले तालुक्यातील एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही असा आरोप करत यास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली.राजूर येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अगस्ती साखर कारखान्या च्या व्हा. चेअरमन सुनीता भांगरे,  शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद धुमाळ, महेश नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, संतोष मुर्तडक, विविध गावांचे सरपंच आदि उपस्थित होते.यावेळी अकोले तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या तक्रारीचा पाढा खासदार वाकचौरे यांच्या पुढे मांडला. या संदर्भात त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या वर कारवाईची मागणी केली.या आढावा बैठकीत सरपंच आणि नागरिकांनी आपल्या भागातील रस्...

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

Image
  अकोले(प्रतिनिधी) अकोले तालुक्यामध्ये वाळू तस्करी, रेशन घोटाळा, दाखले वेळेत न मिळणे शेतकऱ्यांना अनेक कामासाठी चकरा मारायला लागणे, अनेक कामासाठी आर्थिक देवाण-घेवाण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव ग्राहक पंचायतच्यातालुका बैठकीमध्ये घेण्यात आला यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून कारवाईची मागणी करणार असे ठरले. अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील शिंदे हे होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेशराव नवले, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन माधवराव तीटमे, भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, वसंतराव बाळासराफ, बबनराव तिकांडे, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे,  साहेबराव दातखिळे, राजेंद्र घायवट बाळासाहेब बनकर राजेंद्र गवांदे शारदा शिंगाडे रामदास पवार, प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता ...

अकोले-स्थानिकांचा वाळुला विरोध,लाभार्थी आत्मदहनाचा इशारा देण्याच्या तयारीत,घरकुल लाभार्थी वाळु पासून वंचितच

Image
अकोले तालुक्यातील कळस गावातील शासकीय वाळु डेपोतुन घरकुलांसाठी पाच ब्रास वाळु दिली जात असुन ढोकरी गावातील लाभार्थ्यी यांनी तलाठी व तहसीलदार कार्यालयाला सबंधित गोष्टी शासकीय पूर्तता केल्यानंतर कळस गावातील वाळु डेपो तुन वाळु वाटप करण्यात येत आहे माञ स्थानिक,शासन व वाहततुकदार यांच्या वादात माञ लाभार्थी वंचित राहत असल्याचे नाराजी ढोकरी गावातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे कारण स्थानिक ढोकरी व शेजारील गावातील इतर ग्रामस्थांनी वाळु वाहतुकीसाठी एका वाळु व्यवसायिकाचे वाहने भाड्यापोटी सांगितले आहे.ही वाहने शासकीय नियमाच्या प्रमाणे जि.पि.एस.प्रणालीव्दारे नियमाच्या आधिन राहून काम करत असल्याच सुञांकडुन कळत आहे.तसेच जेसीबी ला कॅमेरा सिस्टीम असल्याने कुठल्याही प्रकारचे अनधिकृत काम केले नसल्याच वाळु वाहतूक करणा-या व्यवसायिकाने कळवले आहे माञ स्थानिक ठिकाणची वाळु ही बाहेर गावी जात असल्याने व स्थानिक काही मंडळींनी विरोध केला आहे यामुळे महसुलमंञी व शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली गेल्याच दिसत आहे.आज रोजी घरकुल बांधकाम करणा-या लाभार्थ्याला पाच ब्रास वाळु देण्याचे धोरण सरकार कडून घेण्यात...

अकोले-भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु,रंधा फाॅल सुरु,पर्यटकांनासाठी पर्वणी

Image
अकोले-(प्रतिनिधी )-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून आज   रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7441दलघफू (67.41%) झाल्याने रंधा फॉल सुरु झाला असुन पर्यटकांना पर्वणी सुरु झाली आहे.भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरीता  भंडारदरा धरणातुन विदयुतगृह मधून 845 क्युसेक्स तर स्पील वे गेट मधून 1058 क्युसेस ने पाणी सोडण्यात आले असून एकूण 1903 क्युसेस पाणी धरणातून विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. 15 जुलैपर्यंत 65% लेव्हल कायम ठेवण्यात येणार आहे. असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले.मागील दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले होते. पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार, असे वाटत आहे असतानाच  सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर कमी जास्त होत असून गत २४ तासात भंडारदरा 30 येथे  मिमी, घाटघर 74 मिमी, तर रतनवाडी येथे 66 मिमी, पांजरे येथे 58 मिमी पाऊसाची नों...

अकोले-देवठाण येथिल आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरले,लाभधारकांमध्ये आनंदाचे वातावरण

Image
अकोले -( प्रतिनिधी)तालुक्यातील देवठाण येथील 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज दुपारी 12 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. सध्या 60 क्यूसकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.   आढळा धरण हे 1060 दलघफू क्षमता आहे. हे धरण चालू वर्षी जुलै च्या पहिल्या आठवड्यात भरत असल्याने शेतकरी बांधव प्रचंड खुश आहेत. रब्बी पिक व पिण्याचे पाण्याची व्यवस्था झाली आहे.अकोले तालुक्यातील देवठाण वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा या १६ गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते याशिवाय पाच गाव पाणीपुरवठा योजना असून या गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण प...

अकोले-रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर पदी रो.अमोल वैद्य

Image
  अकोले -प्रतिनिधी-रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या असिस्टंट गव्हर्नर पदी रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकारिहू  रो.अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी क्लबची स्थापना अकोले येथे 2017 मध्ये करण्यात आली. सामाजिक बांधिलकी असणारे विविध क्षेत्रातील तरुण यांचा रोटरी क्लब मध्ये समावेश आहे. रोटरी क्लबच्या स्थापनेपासून आज पावेतो सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब अकोले अग्रेसर राहिला आहे. रोटरी क्लब च्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अकोले रोटरी क्लबचा "बेस्ट न्यू क्लब "व "सायटेशन ट्रॉफी" देऊन डिस्ट्रिक्ट 3132 ने सन्मान केला आहे. रो. अमोल वैद्य यांनी यापूर्वी रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये पब्लिक इमेज चे डायरेक्टर पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली. रोटरी क्लबचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविन्यासाठी रो.अमोल वैद्य हे परिश्रम घेत आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्...