अकोले-अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब...स्वरा काळु तपासे हिची सातारा सैनिकी स्कूल साठी निवड


       
अकोले- संरक्षण मंत्रालय संचलित सातारा सैनिकी स्कूल येथे स्वराची इयत्ता सहावी साठी निवड. संरक्षण मंत्रालय  भारत सरकार यांचे देशभरामध्ये फक्त 33 सैनिकी स्कूल आहेत.या विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थी परीक्षा देतात.
 स्वराने  या प्रवेश परीक्षेमध्ये 300 पैकी 279गुण मिळवून राज्यांत मुलींमधून (एस.सी.प्रवर्गातून) पहिला येण्याचा मान मिळवला.  सातारा सिव्हिल येथे दोन दिवसाचे मेडिकल पूर्ण केल्यानंतर तिची निवड निश्चित झाली.स्वरांनी इयत्ता चौथीत असतानाच पहिल्या प्रयत्नात सैनिक स्कुल चंद्रपूर येथे प्रवेश मिळवला होता. चालू वर्षी ती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नवोदय  विद्यालय  टाकळी ढोकेश्वर  अहिल्यानगर येथे ही निवड झाली होती.स्वरा जि. प प्रा. शाळा धामणगाव आवारी ची विद्यार्थीनीं असून तिच्या यशा मध्ये वर्ग शिक्षक श्री विक्रम गायकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच आय कॅन इन्स्टिट्यूट पंढरपूरचे संचालक विवेकानंद भोसले सर व आय कॅन इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री नवनाथ देशमुख सर यांचे  वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. तसेच गणित विषयांचे शिक्षक श्री. शिवाजी रुपनर  सर यांचे मार्गदर्शन मिळाले.स्वराला पुढील वाटचालीसाठी भिमक्रांती तरुण मित्र मंडळ सावरकुटे व इंडियन बहुजन टीचर असोसिएशन अकोले यांनी शुभेच्छा दिल्या.स्वरा चे वडील  श्री. काळू तपासे प्राथमिक शिक्षक असून आई  शितल तपासे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका आहेत.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस न्यूज पोर्टल साठी संपादक किशोर मोहिते.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..