अकोले-राजेंद्र कुमकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपजिल्हाध्य पदाचा तडकाफडकी राजिनामा
अकोले तालुक्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असुन अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी आपला राजिनामा पक्ष वरीष्ठांकडे सोपवला आहे अकोले तालुक्यात सध्या राष्ट्रवादी पक्षात मोठा गोंधळ चालु असल्याच पहायला मिळत आहे कालच पक्षातील काही कार्यकर्ते यांची नव्याने पदनियुक्ती करण्यात आली माञ काल निवडीनंतर काही ठराविक कार्यकर्ते हे पक्षात नाराज असुन त्यांनी राजिनामा देणे पसंत केले आहे.राजेंद्र कुमकर यांना वारंवार तालुका अध्यक्ष देऊ असा श्ब्द पक्षाच्या वरीष्ठांकडुन देण्यात आला होता मान"बोलाची भात आणि बोलाची कढी"या प्रमाणे पक्षात त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्ष केला आहे.२०१९नंतर निष्ठावंत म्हणुन आज पर्यंत पक्षात फक्त कार्यकर्ते यांचा फक्त वापर करुन घेण्यात आला निष्ठावंतांना पदे न देता वरिष्ठ पदाधिकारी यांची पुढे,पुढे करणाऱ्या काही ठराविक पक्षात आयत्यावेळी आलेल्या स्थानिक नेत्यांना पदे देण्यात आली तसेच निष्ठावंत व संघटन कौशल्य असलेल्या कार्यकर्ते यांना संधी मिळत नसल्याने तसेच यामुळे जुन्या कार्यकर्ते यांच्यावर होणारा वांरवार होणाऱ्या अन्यायाला व मनामानीला कंटाळुन अखेर काही कार्यकर्ते यांनी राजिनामा देणार असल्याच नाव न सांगण्याच्या अटीवर कळवल आहे तसेच अकोले तालुक्यात शरद पवार गटातील प्रमुख नेतृत्व हे कोणाला ही विश्वासात न घेता मनमानी कारभार चालु आल्याच विधानसभेच्या निवडणूकीनंतर लक्षात आल आहे येत्या चार दिवसात काही मोजक्या कार्यकर्ते हे राजिनामा देणार आहे त्यातच प्रमुख नेतृत्व करणारे,विधानसभेचे उमेदवार अमित भांगरे यांच्याच मातोश्री सुनिताताई भांगरे या भाजप पक्षात गेल्या व या आतिंम प्रवेशाच्या बैठकीसाठी अमित भांगरे यांनी मंञी विखे पाटील यांच्या वाड्यावर हजेरी लावली होती.यामुळे कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत पडले होते.एकीकडे अमित भांगरे हे शरद पवार गटाचे नेतृत्व जिल्हा युवक अध्यक्ष व स्थानिक अकोलेत नेतृत्व करणार आणि दुसरीकडे विरोधी महायुतीची उमेदवारी ही त्यांच्या मातोश्री सुनिताताई भांगरे करणार यामुळे कार्यकर्ते हे संगमनेर मध्ये लाल बत्ती चौकात उभे असल्याचा भास संभ्रमात असलेल्या कार्यकर्ते यांना पडला संगमनेर मधून लोणी कडे जायचे की बारामतीकडे असा प्रश्न आता शरद पवार गटातील कार्यकर्ते यांना पडला आहे.विधानसभेत झालेला अमित भांगरे यांचा झालेला निसटता पराभवाला अशीच कारणे पुढे येत असुन पक्ष प्रचारात ठरावीक कार्यकर्ते यांनाच प्रचारात सहाभागी करत काही कार्यकर्ते यांना प्रचार यंञणेच्या बाहेर ठेवण्यात आले होते माञ विधानसभा पार पडल्यानंतर अमित भांगरे यांनी अकोलेच्या जनतेचे आभार मानले नाही किंवा त्यांच्याशी संवाद ठेवला नाही.जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर ते सक्रिय झाले यामुळे कार्यकर्ते यांना फक्त गृहीत धरून निवडणूका लढवल्या जात आहेत या सगळ्या गोष्टींची खदखद ही अनेक मंडळीच्या राजिनाम्याच्या निमित्ताने शरद पवार गटातुन बाहेर पडणार आहे माञ शरद पवार गटाची सध्या होणारी फरफट ही जाणीवपूर्वक केली जात असुन सुपारी घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हद्दपार करण्याचा विडा काही मंडळींनी उचलला असल्याच खाजगीत कार्यकर्ते बोलत आहे.
क्रमशः -भाग-३


Comments
Post a Comment