अकोले-उंचखडक बु सारख्या झेडपी शाळा सर्वत्र व्हाव्यात - डॉ. मैथिलीताई तांबे
अकोले -गेल्या दोन वर्षापुर्वी बंद पडलेली उंचखडक बु येथील जिल्हा परिषदेची शाळा आज सामाजिक, आर्थिक, भौतिक व गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न झाली आहे. शुन्य ते ७० पटाचा प्रवास, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, प्रथम क्रमांक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी निवड, आयएसओ मानांकन, पहिल्याच प्रयत्नात नवोदय विद्यालयासाठी व सैनिक स्कुलसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड, विज्ञान प्रदर्शन व स्कॉलरशिप तसेच सांस्कृतीक व क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक अशा विविध स्पर्धेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. उंचखडक बु सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वत्र व्हाव्यात असे प्रतिपादन संगमनेराच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केले. त्या मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ रोजी उंचखडक बु येथील जिल्हा परिषद शाळेच्या विविध गुणदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर क्लासवन अधिकारी प्रा. अरुण भांगरे, रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, रोटरी क्लबचे प्रांतपाल अमोल वैद्य, शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर, कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे आदि उपस्थित होते. या कार्यक्रामाचे अध्यक्षस्थानी भाऊमामा खरात होते.यावेळी डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, शाळा चालविण्यासाठी चार स्तंभ असणे आवश्यक असते. त्यात मुख्याध्यापक, पालक, प्रशासन आणि सक्षम शाळा व्यवस्थापन समिती हे सर्व स्तंभ उंचखडक बु शाळेला लाभले. म्हणून तर एक बंद पडलेली शाळा राज्याच्या आणि देशाच्या पटलावर जाऊ शकली आहे. उंचखडक बु हे गाव छोटे असेल तरी शेतकरी दृष्ट्या सदन आहे. तरी देखील येथील पालकांनी शाळेवर विश्वास टाकला असून मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविले आहे. याच शाळेचे तीन माजी विद्यार्थी नुकतेच क्लासवन अधिकारी झाले असून त्यांचा येथे सत्कार करण्यात आला आहे. माझ्या माहितीनुसार इयत्ता पाचवीचा वर्ग याच वर्षी सुरू झाला आहे. त्यात २६ विद्यार्थी शिक्षण घेत असून अकोले तालुक्यातील अधिकार्यांची मुले शहराच्या ठिकाणाहून ग्रामीण भागात शाळेत येतात ही फार मोठी कौतुकाची बाब आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात सामान्य कुटुंबातील विद्यार्थी नवोदय आणि सैनिक स्कुलसाठी निवडली जातात यापेक्षा अधिक काय गुणवत्त्ता सिद्ध करावी. त्यामुळे, उंचखडक बु शाळेसारख्या सगळीकडे शाळा झाल्या पाहिजे म्हणजे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळु शकेल असेे मैथिलीताई तांबे म्हणाल्या यावेळी क्लासवन अधिकारी प्रा. अरुण भांगरे, अभिजित देशमुख, सुरेश मंडलिक, श्रीकांत मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली स्वरा शिंदे व निशिता बोराडे, तसेच मिशन आरंभमधील पात्र विद्यार्थी सम्यक तपासे, सैनिक स्कुलसाठी निवड झालेला सोहम खोकले यांच्यासह काही विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उंचखडक बु येथील शाळा उभी करण्यासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली असे रवि रुपवते, काळु तपासे, विक्रम गायकर, गोविंद खोकले, केंद्रप्रमुख बडे सर यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब खरात, भाऊसाहेब देशमुख, श्यामराव देशमुख, सागर देशमुख, तुषार देशमुख, अमोल शिंदे, विकास खरात, संदेश खरात, महेश खरात, महेश जेजुरकर , प्रतिक मंडलिक, अजय खरात, विशाल देशमुख, सोपानराव देशमुख, आबासाहेब मंडलिक, उपाध्यक्षा मनिषाताई देशमुख, घुले मॅडम, क्षिरसागर मॅडम, बडे मॅडम, शितलताई देशमुख, हर्षदाताई देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्षिरसागर मॅडम व काळु तपासे यांनी केले तर भाऊमामा खरात यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment