अकोले_श्री.नाजिम शेख यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस महामंञी पदी निवड
अकोले (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी जनसेवा कार्यालय, लोणी येथे जाहीर करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश प्रभारी राजेश पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासीत अली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, अकोले तालुक्याचे मा. आ. वैभवराव मधुकरराव पिचड, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, महामंत्री एजाज शेख तसेच भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.नूतन जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सोशल मीडिया प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्यां...