अकोले-कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा तालुका अध्यक्ष ?

अकोले-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा अध्यक्ष कोण होणार ? याबाबत अकोले तालुक्यात सध्या जोरदार चर्चा चालु आहे.याला कारण ही तसेच आहे कारण स्पर्धकांमध्ये मात्तब्बर स्पर्धक यात दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा अकोले तालुक्यात मोठा समर्थक,चाहता वर्ग असुन ही तालुक्यातील या वर्गाला दिशा देणारा प्रमुख,अध्यक्ष हा शरद पवार गटाला मिळत नसल्याने कार्यकर्ते हे दिशाहीन झाल्याच चिञ अकोले तालुक्यात निर्माण झाल आहे.अध्यक्ष होण्यासाठी काही प्रमुख नावे सध्या चर्चेत दिसून येत एक राजेंद्र कुमकर,दुसरे विनोद हांडे,तिसरे सुरेश गडाख अशी सर्व नावे सध्या शरद पवार गटात अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेतृत्व अकोले तालुक्यात स्वर्गीय लोकनेते अशोकाराव भांगरे यांच्या कुटुंबियाकडे आहे.अगस्ती कारखान्याच्या व्हा.चेअरमन सुनिताताई भांगरे व युवानेते अमित भांगरे करत आहेत.माञ निवडणुका जवळ येत असताना ही कार्यकारणी का जाहीर केली जात नाही हे कारण गुलदस्त्यात आहे.अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकारी नेमणुका या झाल्या आहेत.माञ.शरद पवार गटाच्या अकोले कार्यकारणीला वेळ का लागतेय याची कारणे अनेक दिसून येत आहेत.प्राथमिक पाहिले लाॅबींग करुन अध्यक्ष बनवण्याची प्रक्रिया चालु असल्याच सध्या तरी दिसत आहे.माञ अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला आक्रमक व आश्वासक चेहर्याची गरज असणार आहे.अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले अनेकजण हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते अपवादानेच काहीजण हे भाजप पक्षाच्या व्यासपीठावर वावरताना दिसले आहेत.तेच आता पुढे येऊन अध्यक्षपद आपल्या गळ्यात पडले पाहिजे यासाठी अगदी वरीष्ठांच्या संपर्कात असुन आपणच कसे अध्यक्ष योग्य राहू तसेच निष्ठावान म्हणून मी कसा योग्य आहे यासाठी सेटींग लावली जात आहे.यामुळे अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाला चुकीचा अध्यक्ष जर मिळाला तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा फटका पुढील निवडणुकांत बसणार आहे.माञ पवार गटाला कोण जवळचटकोण लांबचा यापेक्षा पक्षहितासाठि कोण चांगले काम करु शकेल,भुमिका मांडु शकेल याची गरज असणार आहे.भावी अध्यक्षपद भुषवणार्या पैकी बाळासाहेब भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आहेत.आपण इच्छुक असुन पक्षाने मला संधी द्यावी अशी साद सध्या ते पक्ष वरिष्ठाकडे करत आहेत.राजेंद्र कुमकर हे तांभोळ गावचे रहिवासी असुन त्यांनी २०१९साली झालेल्या परिवर्तनाच्या लढाईत त्यांनी मोठा सक्रीय सहभाग नोंदवला होता.मोठी जबाबदारी त्यांनी संभाळली होती.कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी त्यांचा दांडगा संपर्क दिसून येतो यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून कुमकर यांच्याकडे पाहिले जाते.तसेच विनोद हांडे हा चेहरा ही पवार गटाकडे असुन संयमी व अभ्यासू पध्दतीने ते नेहमीच भाषण करत असतात.त्यांनी या अगोदर प्रदेश कार्यकारणीवर काम केले आहे.तर सुरेश गडाख हे ही पवार गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असुन रोहीत पवार व इतर वरिष्ठाशी त्यांचे सलगीचे सबंध कधी ही लपून राहिलेले नाहीत.माञ ते २०१९च्या परीवर्तनासाठी एकास,एकची हाक  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली त्यावेळी गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासुन लांब राहिले आहेत.शिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठे सक्रिय सहभाग दिसलाच नाही.माञ नंतरच्या कालावधीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलीच नव्हती असा घुमजाव त्यांनी केला होता.यामुळे गडाख यांचे अध्यक्ष पदासाठी नाव पुढे आले तर राष्ट्रवादीत पुन्हा दोन परस्पर विरोधी विरोधी गट उदयास येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.यामुळे आता भांगरे कुंटुबियांना आता पक्षासाठी योग्य अध्यक्ष निवडीचा मुद्दा समोर असणार आहे.भांगरे कुटुंंबियांनी लवकरात,लवकर हा तीढा सोडवून अध्यक्षपद कोणाला हे घोषित करावे,तसे पञ त्यांनी वरीष्ठांना द्यावे अन्यथा आम्हांला अध्यक्ष व पदाधिकारीच नसल्याने आम्ही पक्षीय व इतर प्रश्नांचे निराकारण कोणाजवळ करावे हा मोठा प्रश्न आहे.तसेच निवडणुका जवळ आल्यानंतर जर ऎनवेळी पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या तर पक्षासाठी निवडणुका लढवणे,संघटन करणे अवघड कठीण जाईल अशी चर्चा कार्यकर्ते आता खाजगीत करत आहेत.माञ अध्यक्षपदाचा तिढा कोण,कोणाचा समर्थक यात अडकलाय यात माञ शंका नाही.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस संपादक-भाऊसाहेब साळवे

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प