अकोले-जनसंघर्ष संघटनेच्या वतीने दुध दरात वाढ व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरु..

आज अकोले येथे जनसंघर्ष संघटनेच्या वतीने दुध उत्पादक शेतकरी यांनी आपल्या विविध मागण्यासाठी रास्ता रोको करत आंदोलन केले आहे.आमरण अन्नत्याग उपोषण हे चालु जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहणार असल्याच आयोजकांकडुन सांगण्यात आल आहे.अहमदनगर जिल्हातील अनेक शेतकरी या ठिकाणी येत असुन या आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल अस चिञ दिसत आहे.दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे सह्याद्री आतिथी महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व सबंधित खात्याचे मंञी यांची बैठक झाली होती.ही बैठक निष्फळ झाल्याने राज्यातील दुध उत्पादक यांची निराशा झाली यामुळे जनसंघर्ष संघटनेच्या वतीने आज दुध दराविषयी एल्गार पुकारला आहे.यावेळी कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.विविध फलक हातात घेऊन आंदोलक आज हाजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.सर्व आंदोलक हे जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदिप दराडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतुकची कोंडी झाली होती.महाराष्ट्रातील अनेक दुध संघटना व दुध उत्पादक यांनी  या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.अकोले तालुक्यातील अनेक दुध उत्पादकांनी यावेळी आपल्या काही प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत.दुधाला ५० रू. हमीभाव मिळावा,पशुखाद्याच्या किंमती ५० टक्क्यापेक्षा पेक्षा कमी कराव्यात,पशु औषधे जी.एस.टी. तून मुक्त करण्यात यावी,प्रत्येक गावात अद्यावत पशुवैद्यकिय प्रयोगशाळेसह पशुवैद्यक व दवाखाना असावा,सर्व प्रकारचे लिंग निर्धारित विर्य मात्रा माफक दरात शासनाने उपलब्ध करून दयावेत,महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षात अन्नभेसळ प्रतिबंधक पथकांनी किती कारवया केल्या व किती भेसळखोर आरोनींना शिक्षा किंवा दंड ठोटावला याची श्वेत पत्रिका काढावी अश्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे आला होता.यावेळी जनसंघर्ष संघटनेचे संघटक डाॅ. मोहन पवार,शुभम आंबरे,दिपक पथवे,तुळशीराम कातोरे,निलेश गवांदे,महेश सोनावणे,बाळासाहेब भांगरे,मिलिंद नाईकवाडी,सुनिल लोखंडे,नितिन डुंबरे,भीमाशंकर मालुंजकर,जयराम नवले व इतर दुध उत्पादक आमरण शेतकरी हे उपोषणास बसले आहेत.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी किशोर मोहिते अकोले

Comments