अकोले-अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब भांगरे इच्छुक---

अकोले-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाच्या) अध्यक्षपदासाठी आता मोठी स्पर्धा सुरु झाली असुन बाळासाहेब भांगरे,चंद्रभान नवले,आर.के उगले यांनी आपण इच्छुक असल्याच पक्ष वरीष्ठ यांना  कळवत आपल्या भावना मांडल्या आहेत.आपण शरद पवार यांच्या बरोबर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून बरोबर असल्याची भावना बोलून दाखवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याबाबत न्यूज सह्याद्री एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टलवर हे वृत्त प्रसारित होताच अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी संपर्क करत इच्छुक असल्याची भावना प्रकट केली आहे.मनोहरपुर येथिल रहिवासी असलेले वारकरी संघटनेच्या खजिनदार पदी काम केले आहे बाळासाहेब भांगरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की मी अनेक वर्षा पासून शरद पवार साहेबांचा चाहता असुन काँग्रेस पक्षात पवार साहेब असल्यापासून मी त्यांच्या सोबत आहे.मी कधी ही पक्ष न सोडता पवार साहेब यांच्या भूमिकेत सोबत राहिलो आहे.यामुळे मी या अध्यक्षपदाचा दावेदारी असुन पक्ष वरीष्ठ यांनी माझ्या भावनांचा विचार करावा.माझी भुमिका मी कधी ही बदललेली नसून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढी साठी काम करण्यास इच्छुक आहे.माझ्या निष्ठेचा विचार व्हावा अशी प्रतिक्रीया त्यांनी कळवली आहे.तसेच आक्रमक व सष्टवक्ते समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आर.के.उगले यांनी म्हटल आहे की मी पक्षाचा अनेक वर्ष निष्ठावंत असुन मी पण या पदासाठी इच्छुक आहे माञ माझी आर्थिक व कौटुंबिक स्थितीचा व्याप पाहता मी वेळ देऊ शकत नाही माञ पक्ष वरीष्ठांनी येणार्या आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षाला अध्यक्ष नसेल तर कोणाच्या संघटनात,नेतृत्वात काम करावे असा प्रश्न आहे.यामुळे पक्ष वरीष्ठ यांनी कार्यकारणीच्या संदर्भात लवकरात,लवकर निर्णय घ्यावा.व अकोले तालुक्यातील शरद पवार गटाला अध्यक्ष द्यावा.पक्ष वरीष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहिल.
यावेळी चंद्रभान नवले यांच्या मते मी पक्षाचा अध्यक्ष होण्यास पाञ असुन माझा विचार व्हावा मी अनेक वर्षापासून पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे.माझ्या रक्तातच शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे.मी पक्षवाढीसाठी प्रमाणिक प्रयन्न करील यामुळे माझा अध्यक्षपदासाठी विचार व्हावा अशी भावना त्यांनी पक्ष वरिष्ठांना कळवली आहे.
----
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाता आता अध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असुन पक्षाला सर्व बाजुंनी भक्कम असा अध्यक्ष असायला हवा नेतृत्व,कर्तुत्व,आक्रमक मांडणी याचा संगम असणारा अध्यक्ष असायला हवा कारण येणार्या कमी कालावधीत जि.प.,पंचायत समिती,लोकसभा, विधानसभा ऎकमेंकानंतर लगेच असणार आहे जर अध्यक्षपदाची निवड चुकली तर पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.पक्षाला पूर्णवेळ काम करणारा ॲटिव्ह अध्यक्ष मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चांगली कामगिरी करु शकेल
---

Comments