अकोले-वांजुळशेतच्या सरपंचपदी सौ पद्मिनी भांडकोळी व उपसरपंचपदी श्री तुकाराम कोंडार यांची निवड .
अहमदनगर जिल्हामध्ये ५ नोंव्हेंबरला १९४ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यामधे ५ नोव्हेंबरला मतदान होवून त्यांचा निकाल सोमवार दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झाला . त्यामध्ये वांजुळशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. पद्मिनी मच्छिंद्र भांडकोळी यांची जनतेमधून बहुमताने सरपंचपदी निवड झाली .
सरपंच निवडणूक झाल्यानंतर दि. २३/ ११ /२०२३ रोजी उपसरपंच निवडणूक सरपंच सौ. पद्मिनी भांडकोळी यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निरीक्षक श्री वाकचौरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली . यामध्ये उपसरपंचपदि .श्री तुकाराम भदु कोंडार यांची सदस्यांमधून बहुमताने निवड करण्यात आली . उपसरपंच पदासाठी एकूण ८सदस्य व सरपंच यांच्या सहकार्याने उपसरपंच निवडणूक पार पडली. यावेळी किसन लोहकरे, चंद्रभान वाळेकर, लता सोमनाथ वाळेकर, वैशाली सदगिर, मंजुळाबाई कोंडार, रत्ना सचिन कोंडार,हे ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य याच्या निवडीबद्वल अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे साहेब, अगस्ती कारखान्याचे संचालक श्री यमाजी लहामटे, सहयाद्री कळसुबाई अभय अरण्याचे वनपाल श्री के.डी पडवळसाहेब, उद्योजक चंद्रकांत तांबेकर, मारुती तांबेकर श्री चिमाजी वाळेकर ,मा . सरपंच सोमनाथ वाळेकर , पो. पाटील .सुमनताई बाळु सदगिर कोहंडीगावचे सरपंच श्री . पांडुरंग तातळे, मा .मुख्या बाळु चिखलेसर ,मा सरपंच लालू हिले, मधूकर सोनवणे, ग्रा.पं. सदस्य शिवराम हिले, दुंदा पडवळे, भवानराव सदागिर, धोंडिबा लोहकरे, काळू चिखले, काळु सदगिर,भाऊसाहेब भांडकोळी, किरण भांडकोळी, ज्ञानदेव शेंगाळ, संजय लोहकरे, निवृत्ती लोहकरे, बाळू लोहकरे, काळू बर्वे, नामदेव देठे, पंढरीनाथ बर्वे, सत्यवान बर्वे, लहानु देठे, सुधाकर बर्वे, दिपक बर्वे, एकनाथ चिखले, ज्ञानदेव पेढेकर, विठ्ठल पेढेकर, रामदास लोहकरे, लहानु लोहकरे यांनी अभिनंदन केले आहे.प्रतिनिधी-किशोर मोहिते
Comments
Post a Comment