अकोले-२०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नसणारी व्यक्ती अध्यक्ष झाली तर तो मान्य नाही-

अकोले-अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत नसणारा व्यक्ती अकोले तालुका अध्यक्ष झाला किंवा शरद पवार गटाचा अध्यक्ष म्हणुन पक्ष वरीष्ठांनी लादल्यास पक्षाला पुढे भविष्यात अडचणी निर्माण होतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)कार्यकर्ते खाजगीत चर्चा करत आहे.अकोले तालुक्यात २०१९साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक तळागाळातील युवक,जेष्ठ,महिला भगीनी कार्यकर्ते यांनी स्वत:ला झोकून काम केल आहे.मोठा दबाव असताना ही अनेक कार्यकर्ते गावोगावी पुढे येऊन काम करत होते माञ काही मंडळी ही त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळ ही फिरकली नव्हती,त्यावेळी भावी अध्यक्ष पदाचे सप्न बाळगणारे भाजप पक्षाच्या सोबत होते आता हीच मंडळी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून लादणार असतील तर सामान्य कार्यकर्ते यांना तो मान्य नाही.काही मंडळी जाणीवपूर्वक आपले व्यक्तीगत सबंध जोपसण्यासाठी २०१९मध्ये सोबत नसलेल्या मंडळींची खाजगीत पक्ष वरीष्ठांकडे शिफारस करत असुन पक्षाचे हित न बघता वैयक्तिक हितासाठी जर कोणी पक्षाला वेठीस धरत असेल तर कार्यकर्ते यांना ही अश्या नेत्यांच्या बद्दल विचार करावा लागेल.एकीकडे हे चिञ असताना अकोले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांच्या मर्जीने अमुक व्यक्तीच अध्यक्ष व्हावी यासाठी छुप्या पध्दतीने हलचाली चालु झाल्या आहेत.यामुळे पवार गटाचा अध्यक्ष निवडण्यासाठी छुप्या पध्दतीने अकोले अजित पवार गटाकडुन ताकद दिली जात असल्याने नेमक्या कोणत्या उद्देशापोटी ही ताकद पुरवली जात आहे याचा अर्थ अनेकांना लक्षात येत नाही.यामुळे ज्या व्यक्तीचे नाव जाणीवपूर्वक त्याचे आणी आमदार किरण लहामटे गटाचा फायदा होणार आहे का?हा सवाल आहे.पक्ष अडचणीत असताना आम्ही काम करायचे ऎनवेळी दुसर्या पक्षातील प्रास्थापित मंडळी पक्षाच्या अध्यक्षपदाचा ताबा घेणार असतील तर वेळ पडली तर या कारणामुळे पक्ष सोडण्याचा विचार आम्हांला करावा लागेल अशी आक्रमक भुमिका खाजगीत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.उद्या अकोले पदाधिकारी निवडीच्या संदर्भात बैठक होणार असुन या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आपल्या भावना बोलून दाखवत आहेत.यामुळे पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी यांनी विचारपूर्वक अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे.

Comments