मुंबई-दुधदराच्या बाबतची बैठक निष्फळ..
मुंबई-दुध उत्पादकांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे आज सह्याद्री गृहावर झालेल्या दुध उत्पादक प्रतिनिधी व संघटना यांच्या बरोबर झालेली बैठक निष्फळ झाल्याची बातमी आता समोर येत आहे.राज्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.बैठकीतुन योग्य मार्ग निघत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.
यावेळी शेतकरी नेते काॅ्म्रेड नेते अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की
दुग्धविकास मंत्र्यानी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दुध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. सरकारने काढलेला दूध दर आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 34 रुपये दर देण्यास नकार दिला आहे. सरकारच्या आदेशाची अशी अवहेलना होत असताना सरकार आजच्या बैठकीत केवळ गुळमुळीत सारवासारव करताना दिसले. सरकारच्या आदेशाची किंमत रद्दीची असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. असे रद्दी शासनादेशाची 24 नोव्हेंबर रोजी दूध संकलन केंद्रांवर राज्यभर शेतकऱ्यांनी होळी करावी व विविध मार्गाने आंदोलन तीव्र करावे असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे. राज्यभर शेतकरी कार्यकर्ते उपोषण, रास्तारोको व दुग्ध अभिषेक घालून दूध दराच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. अशा सर्व आंदोलनांना संघर्ष समिती पाठिंबा व्यक्त करत आहे.तसेच जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदिप दराडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटल आहे की मा. दुग्धविकास मंत्री ना. विखे साहेब यांच्या नेतृत्वात जी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झाली ती निष्फळ ठरली अशी बातमी समोर आलेली आहे.. राज्य शासनाने शेतकरी बांधवाना ग्राह्य धरण्याचं आणि शतकऱ्यांचे परिवार उध्वस्त करण्याचं काम सुरु ठेवलेलं आहे.. आमच्या जन संघर्ष संघटनेकडून आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून पुकारलेलं अमरण उपोषण आता गुरुवारी 23 तारखेला अकोले तहसील कार्यालयासमोर सुरु होईल आणि न्याय मिळेपर्यंत लढा दिला जाईल, या लढ्यासाठी अकोले, धामणगाव, शेलद, पाडाळने, आंबड, औरंगपूर, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, ढोकरी, रेडे, सुगांव, कळस, कुंबेफळ, परखतपूर, समशेरपूर, देवठाण, गनोरे, डोंगरगाव, हिवरगाव, विरगाव, कोतुळ, ब्राम्हणवाडा या गावातील सर्व दूध उत्पादक शेतकरी गावांनी एकजूट होऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत.... संदीप दराडे (दूध उत्पादक शेतकरी)
अध्यक्ष जन संघर्ष संघटना
तसेच जन संघर्ष संघटनेचे संघटक डाॅ.मोहन पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटल आहे की जनसंघर्ष संघटनेने मागील आठवड्यात दोन वेळा सरकारदरबारी निवेदन देऊन दूध दरवाढी संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला 22 तारखेपर्यंत वेळ आहे. अन्यथा 23 तारखेपासून संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे.त्या अनुषंगाने गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून सरकार काहीतरी ठोस निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु आज झालेल्या उच्चस्तरीय मीटिंग मध्ये कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे.. उद्या पर्यंत सरकारने या प्रश्नावर तोडगा न काढल्यास जनसंघर्ष संघटना तसेच दूध उत्पादक शेतकर्यांतर्फे ठरल्याप्रमाणे दि. 23/11/2023 पासून अकोले तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषनास सुरुवात करून तीव्र एल्गार पुकारला जाणार आहे.
संघटक डाॅ.मोहन पवार, जन संघर्ष संघटना
Comments
Post a Comment