अकोले-डोंगरवाडी येथे प्रेरणा मैत्री फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप


अकोले-जि. प. प्राथमिक शाळा, डोंगरवाडी येथे प्रेरणा मैत्री फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमाला प्रेरणा मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किसन अमृता पिचड, सचिव श्री. सुनील भोत, सहसचिव श्री. शंकर बांडे,  किरण कोंडार, मुंकुद लहामटे आणि भगवान लहोरे उपस्थित होते.तसेच डोंगरवाडीचे ग्रामस्थ बापू पिचड, मारुती पिचड, किसन मुठे, संजय पिचड, काशीनाथ मुठे, लक्ष्मण पिचड, मनिषा थिगळे, भारती पिचड, बाळू पिचड आणि भरत पिचड यांची उपस्थिती लाभली.जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. खाडे सर, तसेच कैलास पिचड सर आणि सावळेराम पिचड सर यांचीही उपस्थिती होती.

Comments