अकोले_श्री.नाजिम शेख यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस महामंञी पदी निवड

अकोले (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी जनसेवा कार्यालय, लोणी येथे जाहीर करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश प्रभारी राजेश पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासीत अली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, अकोले तालुक्याचे मा. आ. वैभवराव मधुकरराव पिचड, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, महामंत्री एजाज शेख तसेच भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.नूतन जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सोशल मीडिया प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मंडलांसाठी मंडल अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.एकुण अकोले तालुक्यातील पाच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.त्यामध्ये कट्टर पिचड समर्थक असलेल्या श्री. नाजीम शेख यांची जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी निवड करण्यात आली.अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविणे, युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे तसेच पक्षाचे संघटन अधिक व्यापक व मजबूत करण्यावर नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या विचारानुसार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळातील संघटनात्मक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अल्पसंख्यांक समाजातील प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देतानाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे संघटन श्री नाजिम शेख हे हिचार अधिक सक्रिय, सक्षमपणे आणि व्यापक विचार समाज्यात पोहचवतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी व्यक्त केला.अकोले तालुक्यातील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments