अकोले-समशेपुर गावात बेकायदा भिश्यांना ऊत...

अकोले तालुक्यातील समशेरपुर गावात बेकायदा भिशी फंडामुळे अनेक लोक आर्थिक अडचणीत आले असुन एक लाखा पासुन ते पंधरा लाखा पर्यंतच्या किमान पाच तर सहा भिशी चालु असुन काही भिशी चालक हे लोकांचे पैसे बुडवून फरार झाले आहेत तर काही भिशी चालक हे भिशीच्या एकुण निम्म्या रकमेला लिलाव करत असुन गरजेपोटी उचलेलेल्या भिशीचे पैसे परत न करता आल्यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहचले आहेत.बेकायदा चालणाऱ्या या भिश्यांवर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसून काही भिशी चालक हे सावकारी पद्धतीने घरी जात दमदाटी करत असल्याच्या तक्रारी भीतीपोटी नाव न सांगण्याच्या अटीवर करत आहेत.समशेरपुर व परीसरात शेतकरी वर्ग हा अलीकडच्या काळात सधन झालेला दिसत असुन गरजेपोटी भिशीत आपला नंबर लावुन त्या रक्कमेत सप्न पाहत असतो माञ उचलेली रक्कम निम्म्या फरकाने उचलल्यामुळे ती परत न गेल्याने भिशी चालक हे अरेरावी वर उतरत आहेत.यामुले अनेक भिशी मध्ये सहभागी असणारे व्यक्ती हे मानसिकदृष्ट्या व सामाजिक बदनामीमुळे खचले असल्याची तक्रार खाजगीत नोंदवत आहेत यामुळे समशेरपुर गावातील बेकायदा भिशी चालवणा-या व्यक्तींचा शोध घेऊन बेकायदा भिशी चालकांवर निर्बंध लावणे गरजेचे आहे तसेच सबंधित प्रसाशनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments