*अकोले-संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार-डाॅ.संदिप कडलग.*
अकोले-वाशिम येथे शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा भव्य स्वरूपात संपन्न होत आहे.या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संभाजी ब्रिगेड कोणती भूमिका घेणार आणि या मेळाव्यात कशाप्रकारे राजकीय, सामाजिक मांडणी होणार हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.मागील पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जी बांधणी केलेली आहे; त्यामुळे महाराष्ट्रात जातीय-धार्मिक सलोखा निर्माण झालेला आहे.संभाजी ब्रिगेडचे विचारवंत,अभ्यासक,लेखक, व्याख्याते,संघटक आणि सर्वात महत्त्वाचे कार्यकर्ते यांनी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सामाजिक विण मजबूत करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणात संभाजी ब्रिगेडच्या त्याच सौहार्दपूर्ण भूमिकेची लोकांना आवश्यकता निर्माण झालेली आहे.या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे अभ्यासू आणि तेवढेच आक्रमक वक्ते जी भूमिका मांडतील, त्यामधून महार...