Posts

*अखेर सोनालीताई नाईकवाडी अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान*

Image
अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी अखेर सोनालीताई नाईकवाडी यांची निवड झाली असुन उपनगराध्यक्षपदी यांची निवड झाली असुन गेल्या सहा ते सात महिन्यापासून हे राजकीय सत्ता नाट्याचा आज शेवट झाल्याच पहायला मिळाल आहे सोनाली नाईकवाडी ११मते पडली तर विरोधी गटाला अवघी सहा मते पडल्याने एक मताचा गोंधळ दिसुन आला आहे सोनालीताई नाईकवाडी यांच्याकडे बारा मतांचा गट असताना एक मत कोणाचे फुटले अशी चर्चा सुरु खाली आहे..रीस्क नको म्हणुन सातजणांचा गट हा काही दिवस पर्यटनाला गेल्याच दिसुन आल होत.वादविवाद व तणावस्थिती लक्षात घेऊन प्रसाशनाकडुन तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड समर्थक मोठ्या संख्यने जमा झाले होते.भारतीय जनता पार्टीचा विजय असो,वैभवभाऊ तुम आगे बढो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.माजी आमदार पिचड यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने आपल्या नगरसेवकांना सुचना केल्या होत्या कि तुम्ही भाजपाच्या तिकिटावर उमेदवार केली असुन तुम्ही वैष्णवी धुमाळ यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे अवाहन केले होते.ज्यांचा प्रचार करत आमदार वैभवराव पिचड यांनी केला मते मागितली तेच...

अकोले-लढाई अस्तित्वाची,राजकिय प्रतिष्ठेची...,कोण होणार नगराध्यक्ष?

Image
कोण होणार अकोले नगरपंचायतचा नगराध्यक्ष ? याचा फैसला आज होणार असुन भाजपचाच नगराध्यक्ष होणार अशी चर्चा सध्या अकोले शहरात सुरू असुन भाजपाच्या सोनालीताई नाईकवाडी या नगराध्यक्ष होतील असा कयास लावला जात आहे ही निवडणुक सोनाली नाईकवाडी यांच्या साठी राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते तर माजी आमदार पिचड यांच्या राजकीय यांच्या कारकिर्दीला सुरुंग लावणारी म्हणजेच राजकीय अस्तित्वाची मानली जात आहे. उपनगराध्यक्ष पदी नवनाथ शेटे यांची वर्णी लागणार असल्याच समजत आहे.माञ या सगळ्या राजकीय रणधुमाळीत भाजप पक्षाची अंतर्गत असलेली धुसफुस ,गटबाजी यामुळे राजकीय अकोलेत लपून राहिलेली नाही.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपात दोन गट दिसुन आले होते एक गट खुल्या पणाने आमदार लहामटे यांच्या सोबत होता.आज भाजप पक्षाचे नेतृत्व हे माजी आमदार वैभवराव पिचड करत असुन भाजप पक्षातच नगरपंचायत मध्ये दोन गट पडले आहेत.अनेक दिवसांपासुन हे नाराजीनाट्य सुरू असताना सक्षम पक्ष व नेतृत्व समजले जाणारे यांच्या कडे आपल्याच भाजप पक्षातील नगरसेवक यांनी वारंवार नगराध्यक्ष यांचा राजिनामा घ्या व दुस-या व्यक्तीला संधी द्या अशी मागणी होत असताना ही ...

अकोले-अकोल्यात वैभव पिचड यांची भाजप आणि काँग्रेस ची युती? बाळासाहेब थोरात यांचे समर्थक नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

Image
अकोले तालुक्यात सध्या नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर अकोले नगरपंचायत नगराध्यपदावर गंडातर आले आहे,अनेक दिवसांपासुन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आपआपल्या वार्डातच निधी वाटप केल्याचा आरोप अनेक दिवसांपासुन नगरसेवक करत होते याबाबत सत्तेत असणारे (भाजप)नगरसेवक हेच विरोधात असल्याच समोर आले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे नगरसेवक सुद्धा बाळासाहेब वडजे यांच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात आहेत माञ काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक प्रदिप नाईकवाडी हे काँग्रेस पक्षाचे असुन ही भाजप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या भुमिकेबरोबर राहिल्याचे चिञ अकोले शहरात लपून राहिलेले नाही,माञ देशात आणि राज्यात भाजपचा विरोधी पक्ष म्हणूनच असलेल्या काँग्रेस पक्षाची भुमिका ही नगरसेवक प्रदिप नाईकवाडी यांनी आज पर्यंत पाळलेली दिसत नाही. सोनाली नाईकवाडी,प्रतिभा मनकर,हितेश कुंभार,कविता शेळके,माधुरी शंकर,जनाबाई मोहिते,सागर चौधरी,तमन्ना शेख तर भाजपाच्या दुसर्या गटात वैष्णवी धुमाळ,बाळासाहेब वडजे,श...
Image
अकोले तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वे मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पर्यवेक्षक डॉ. सय्यद साहेब आणि खडके साहेब यांच्या देखरेखीखाली आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी अकोले नगरपंचायत हद्दीतील घरोघरी भेट देऊन कंटेनर सर्वे केला. यावेळी घर परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी साठणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया प्रतिबंधासाठी नागरिकांना आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळणे, पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे व ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ...

अकोले_दरडग्रस्त कुटुंबाला मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेकडून मदतीचा हात

Image
, दि. 26 जुलै : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरे येथील श्री.हरी शांताराम उघडे यांच्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचे घर व संसारोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या घटनेची माहिती मिळताच मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेचे सदस्य शंकर लांडे यांनी तातडीने अंथरूण-पांघरूण देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.त्यानंतर 60 सदस्य असलेल्या मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोले यांनी सामाजिक दायित्व जपत ग्रुपच्या एकत्रित निधीतून ₹5,000 किमतीचा किराणा व ₹5,000 किमतीची घरगुती भांडी, अशी एकूण ₹10,000 ची अत्यावश्यक मदत करण्याचा निर्णय घेतला. रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी ग्रुपचे सदस्य डॉ. विष्णू बुळे व सौ. बुळे मॅडम, श्री. राजुशेठ पुंड व सौ. सुशीला पुंड, शंकर लांडे साहेब तसेच बुधाजी पेढेकर सर यांनी पांजरे येथे जाऊन हरी शांताराम उघडे यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेच्या सर्व सदस्यांच्या वतीने किराणा व घरगुती भांड्यांचे मदत ...

अकोलै_पांजरे येथे भूस्खलनग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत

Image
अतिवृष्टीमुळे पांजरे येथील गडदुआई परिसरात श्री. हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तसेच घरातील आठ शेळ्याही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते श्री. भाऊ उघडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच आमदार साहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते त्वरित घटनास्थळी दाखल झालत्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री. शंकर लांडे व त्यांचे सहकारी, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार व त्यांची टीम, घाटघर येथील ग्रामविकास अधिकारी श्री. सोमनाथ गभाले, तसेच स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून बचावकार्य राबविण्यात आले. या मदतकार्याद्वारे श्री. हरी शांताराम उघडे यांच्यासह आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. संबंधित यंत्रणांनी तत्परतेने मदतकार्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

अकोले_९आॅगस्ट आदिवासी दिनासाठी पक्ष ,पार्टी सोडुन एकञ या-दिपक पथवे

Image
अकोले-९आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या पूर्वतयारीसाठी आज अकोले विश्रामगृह येथे आदिवासी समाज्याची आज बैठक पार पडली.यावेळी कार्यक्रामची रूपरेषा व आदिवासी समाज,संस्कृती जपली जावी तसेच आदिवासी महापुरूषांच्या विचाराचे जतन व संवर्धन केले जावे,प्रत्येक घरावर आदिवासी समाज्याचे प्रतिक असलेला झेंडा लावला जावा, तसेच आदिवासी दिनाची पाविञ्यता राखली जावी,पक्ष,पार्टी,संघटना,गट,तट याचा विचार न करता आदिवासी समाज्याचा एक स्वाभिमानाचा व अस्मिता असलेला दिवस म्हणून साजरा करावा असे अवाहन सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिपक पथवे यांनी केले आहे.यावेळी, सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ पथवे, तालुका अध्यक्ष तुळशिराम कातोरे, युवाध्यक्ष विलासराव अगिवले,राजू सावंत, अशोक रावते,सरपंच एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर मेंगाळ,दौलत पथवे,लताबाई मेंगाळ,रोहिणी गावंडे,लहु मेंगाळ,राया ठाकर संघटनेचे अध्यक्ष अक्षय उघडे व पदाधिकारी व अकोले तालुक्यातील राजुर,आढळा,प्रवरा,मुळा व पठार विभागातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते हे उपस्थित होते.