Posts

अकोले_श्री.नाजिम शेख यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस महामंञी पदी निवड

Image
अकोले (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी जनसेवा कार्यालय, लोणी येथे जाहीर करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश प्रभारी राजेश पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासीत अली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, अकोले तालुक्याचे मा. आ. वैभवराव मधुकरराव पिचड, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, महामंत्री एजाज शेख तसेच भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.नूतन जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सोशल मीडिया प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्यां...

अकोले-समशेपुर गावात बेकायदा भिश्यांना ऊत...

Image
अकोले तालुक्यातील समशेरपुर गावात बेकायदा भिशी फंडामुळे अनेक लोक आर्थिक अडचणीत आले असुन एक लाखा पासुन ते पंधरा लाखा पर्यंतच्या किमान पाच तर सहा भिशी चालु असुन काही भिशी चालक हे लोकांचे पैसे बुडवून फरार झाले आहेत तर काही भिशी चालक हे भिशीच्या एकुण निम्म्या रकमेला लिलाव करत असुन गरजेपोटी उचलेलेल्या भिशीचे पैसे परत न करता आल्यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहचले आहेत.बेकायदा चालणाऱ्या या भिश्यांवर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसून काही भिशी चालक हे सावकारी पद्धतीने घरी जात दमदाटी करत असल्याच्या तक्रारी भीतीपोटी नाव न सांगण्याच्या अटीवर करत आहेत.समशेरपुर व परीसरात शेतकरी वर्ग हा अलीकडच्या काळात सधन झालेला दिसत असुन गरजेपोटी भिशीत आपला नंबर लावुन त्या रक्कमेत सप्न पाहत असतो माञ उचलेली रक्कम निम्म्या फरकाने उचलल्यामुळे ती परत न गेल्याने भिशी चालक हे अरेरावी वर उतरत आहेत.यामुले अनेक भिशी मध्ये सहभागी असणारे व्यक्ती हे मानसिकदृष्ट्या व सामाजिक बदनामीमुळे खचले असल्याची तक्रार खाजगीत नोंदवत आहेत यामुळे समशेरपुर गावातील बेकायदा भिशी चालवणा-या व्यक्तींचा शोध घेऊन बेकायदा भिशी चालक...

अकोले-डोंगरवाडी येथे प्रेरणा मैत्री फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप

Image
अकोले-जि. प. प्राथमिक शाळा, डोंगरवाडी येथे प्रेरणा मैत्री फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला प्रेरणा मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किसन अमृता पिचड, सचिव श्री. सुनील भोत, सहसचिव श्री. शंकर बांडे,  किरण कोंडार, मुंकुद लहामटे आणि भगवान लहोरे उपस्थित होते. तसेच डोंगरवाडीचे ग्रामस्थ बापू पिचड, मारुती पिचड, किसन मुठे, संजय पिचड, काशीनाथ मुठे, लक्ष्मण पिचड, मनिषा थिगळे, भारती पिचड, बाळू पिचड आणि भरत पिचड यांची उपस्थिती लाभली. जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. खाडे सर, तसेच कैलास पिचड सर आणि सावळेराम पिचड सर यांचीही उपस्थिती होती.

अकोले(देवठाण)सोनकडा–गिऱ्हेवाडी परिसरात विद्यार्थ्यांची क्षेत्रभेटनिसर्गनिरीक्षण, कमळांनी सजलेले तळे आणि जलसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी

Image
अकोले(देवठाण)_ गिऱ्हेवाडी, दि. ११ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील निसर्ग व नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच निरीक्षणातून शिकण्याची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगाळवाडी, वरखडवाडी, मेनखिंड व गिऱ्हेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोनकडा–गिऱ्हेवाडी परिसरात क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध झाडे, वनस्पती, डोंगर-दऱ्या, शेती व परिसरातील नैसर्गिक घटकांचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक कमळांनी बहरलेले सुंदर तळे पाहिले. पाण्यावर उमललेली कमळे आणि आजूबाजूचा निसर्ग पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसून येत होता. क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील पाण्याचे मोठे टाकेदेखील पाहिले. पाण्याचा साठा, त्याचा उपयोग तसेच पाण्याचे संवर्धन याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे जलसंधारण आणि पाणी बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणातून समजले. क्षेत्रभेटीचा एक महत्त...

अहिल्यानगर कुंभार समाज जिल्हा उपाध्यक्षपदी नगरसेवक हितेश कुंभार यांची एकमताने निवड

Image
  अकोले तालुका कुंभार समाजाची बैठक संत गोरोबाकाका मंदिर कुंभार वाडा अकोले येथे पार पडली.सदर बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्हाचे कुंभार समाज संघटना चे अध्यक्ष श्री राजाभाऊ बोरुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाजाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली समाजाचे अनेक प्रलंबित समस्या व मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी अकोले तालुक्यात सक्षम पदाधिकारी निवड गरजेची आहे असा सूर सर्व समाजबांधवांकडून उमटला अध्यक्ष साहेबांनी तालुक्यातून आलेल्या सर्व बांधवांचे मनोगत प्रतिक्रिया ऐकून घेतल्या व नूतन पदाधिकारी यांची कार्यकारिणी जाहिर केली.सदर कार्यकारिणी मध्ये अकोले नगरपंचायत चे  विद्यमान नगरसेवक  श्री हितेश रामकृष्ण कुंभार यांना जिल्हा कार्यकारणी वर घेत जिल्हा उपाध्यक्ष हे पद घोषणा केली.अकोले तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल नानासाहेब भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष पदी श्री राजेंद्र बाळासाहेब उकिर्डे (तालुका संपर्क प्रमुख अतिरिक्त ), उपाध्यक्ष मनोज शंकर भालेराव, उपाध्यक्ष सर्जेराव कचरू जोंधळे, कार्याध्यक्ष संजय पंढरीनाथ भालेराव, सचिव पदी श्र...

अकोले-कॅप व जिवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न

Image
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाकी जिल्हा परीषद शाळा व प्राजक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कॅप तथा सहयोग उपक्रम व जीवदया प्रातिष्ठाण निंब्रळ यांच्या संयुक्त सहभागातुन काल शालेय विद्यार्थी यांना शालेय उपयोगी वह्या,पुस्तके,पेन्सिल, पेन,रेनकोट हे साहित्य इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन दोन्ही ही संघटना सामाजिक कार्यात सक्रिय असुन दुर्गम,डोंगराळ भागातील शालेय शिक्षण घेणा-या गरजुवंत विद्यार्थी यांच्यासाठी सामाजिक उपक्रम राबवत आहेत.तसेच जीवदया प्रातिष्ठाण  निंब्रळ यांच्याकडुन अनेक वर्षापासुन वृक्षसंवर्धनाचे कार्य गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन अविरतपणे सुरु आहे.विविध गावात जाऊन वृक्षारोपण करणे व वृक्षसंवर्धन व वृक्षरोपणाची चळवळ उभी करत समाज्यात वृक्षाबद्दल जागरूकता व जनजागृती करण्याचे काम जीवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन सुरु आहे. जीवदया प्रातिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे.काल निंब्रळ येथे स्मशानभूमी परीसर सुशोभित व्हावा या...

*अखेर सोनालीताई नाईकवाडी अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान*

Image
अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी अखेर सोनालीताई नाईकवाडी यांची निवड झाली असुन उपनगराध्यक्षपदी यांची निवड झाली असुन गेल्या सहा ते सात महिन्यापासून हे राजकीय सत्ता नाट्याचा आज शेवट झाल्याच पहायला मिळाल आहे सोनाली नाईकवाडी ११मते पडली तर विरोधी गटाला अवघी सहा मते पडल्याने एक मताचा गोंधळ दिसुन आला आहे सोनालीताई नाईकवाडी यांच्याकडे बारा मतांचा गट असताना एक मत कोणाचे फुटले अशी चर्चा सुरु खाली आहे..रीस्क नको म्हणुन सातजणांचा गट हा काही दिवस पर्यटनाला गेल्याच दिसुन आल होत.वादविवाद व तणावस्थिती लक्षात घेऊन प्रसाशनाकडुन तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड समर्थक मोठ्या संख्यने जमा झाले होते.भारतीय जनता पार्टीचा विजय असो,वैभवभाऊ तुम आगे बढो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.माजी आमदार पिचड यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने आपल्या नगरसेवकांना सुचना केल्या होत्या कि तुम्ही भाजपाच्या तिकिटावर उमेदवार केली असुन तुम्ही वैष्णवी धुमाळ यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे अवाहन केले होते.ज्यांचा प्रचार करत आमदार वैभवराव पिचड यांनी केला मते मागितली तेच...